चाकण : बुधवारी १४ जानेवारी २०२६ रोजी मकरसंक्रांतीचा सन आहे. तत्पूर्वी मंगळवारी १३ जानेवारी २०२६ रोजी भोगी सन आहे. भोगीला ''भोगीची भाजी'' केली जाते. त्यामुळे भोगीसाठी लागणाऱ्या फळभाज्यांच्या मागणीत वाढ होणार आहे.
त्यामुळे सोमवारी १२ जानेवारी २०२६ रोजी चाकण मार्केटची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असून तरकारी बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे खेड बाजार समिती प्रशासन व अडत्यांनी सांगितले.