Bhodni Cement Bundhara Pudhari
पुणे

Bhodni Cement Bundhara: भोडणी सिमेंट बंधारा मार्चमध्येच कोरडा; शेतकऱ्यांना चटका

वकीलवस्ती व भोडणी परिसरातील जलसाठा कोरडा पडल्याने शेतकरी व नागरिक चिंतेत, उन्हाळ्यात पिकांना धोका

पुढारी वृत्तसेवा

बावडा: वकीलवस्ती (ता. इंदापूर) येथील भोडणी रस्त्यालगत असलेला सिमेंट बंधारा यंदा मार्च महिन्यातच पाण्याअभावी कोरडा पडला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुमारे 10 ते 11 वर्षांपूर्वी कृषी खात्यांतर्गत जलयुक्त शिवार योजनेतून या सिमेंट बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली होती. वकीलवस्ती व भोडणी परिसरातील शेतातून वाहत येणारे पावसाचे पाणी या बंधाऱ्यात साठविले जात असे. चालू वर्षी पावसाळ्यात हा बंधारा तुडुंब भरला होता. मात्र, सध्या पाण्याअभावी तो पूर्णपणे कोरडा पडला आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील जमिनीतील पाणीपातळी वाढून विहिरींमधील पाणीसाठ्यात भर पडत होती. परिणामी, शेतपिकांना मोठा फायदा होत होता.

तसेच बंधाऱ्यातील पाण्यामुळे शेळ्या, मेंढ्या आणि जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय होत होती, अशी माहिती वकीलवस्तीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग््राामपंचायत सदस्य सदानंद कोरटकर आणि दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे उपाध्यक्ष विक्रम धनंजय कोरटकर यांनी दिली. एकंदरीत, बंधारा मार्चमध्येच कोरडा पडल्याने यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याची शक्यता शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT