Helicopter Pudhari
पुणे

Bhimashankar Helicopter Landing Controversy: भीमाशंकर येथे हेलिकॉप्टर लँडिंगवरून वाद

परवानगीशिवाय लँडिंगचा आरोप; सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे हेलिकॉप्टरने दर्शनासाठी आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी आवश्यक असणारे नियम व प्रक्रिया न पाळता हे लँडिंग करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता हेलिकॉप्टर कसे उतरविले? असा सवाल उपस्थित होत आहे.

नियमानुसार हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी अधिकृत हेलिपॅडची व्यवस्था तसेच संबंधित विभागांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम परवानगी मिळाल्यानंतरच अशा प्रकारचे लँडिंग करता येते. मात्र, या सर्व प्रक्रियेला बगल देऊन हेलिकॉप्टर थेट भीमाशंकर परिसरात उतरविण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जर अशा प्रकारे कोणत्याही परवानगीशिवाय हेलिकॉप्टर उतरविले जात असेल, तर भविष्यात कोणतीही व्यक्ती किंवा संशयित घटक सहजपणे येथे पोहचू शकतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

नियम सर्वांसाठी समान असावेत. परवानगीशिवाय हेलिकॉप्टर उतरविले जात असेल तर ही गंभीर बाब आहे. यामुळे सुरक्षेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.
सूर्यकांत धायबर, संस्थापक, अमरनाथ सेवा संघ, मंचर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT