Bhigwan Flamingos Pudhari
पुणे

Bhigwan Flamingos: भिगवण जलाशयावर फ्लेमिंगो पक्ष्यांचा अलौकिक नजारा

फेब्रुवारी-मार्चमध्ये शेकडो पक्षी आणि स्थलांतरित जलपक्ष्यांचे आगमन, पर्यटकांची गर्दी वाढणार

पुढारी वृत्तसेवा

संजीव फडतरे

पुणे: भिगवण जलाशयावर भल्यापहाटे फ्लेमिंगो पक्षांचा जणू कुंभमेळाच भरत आहे. शेकडो पक्षी आकाशात झेपावतात तेव्हा अग्निपंखांचे विलोभनीय दर्शन होत आहे. हा नजारा डोळ्यात साठवण्यासाठी तेथे पक्षीप्रेमींची गर्दी होत आहे. भिगवण जलाशयात यंदा पाणी भरपूर असल्याने हे पक्षी नेहमीपेक्षा उशिरा आले आहेत. पाणी उथळ होताच. शेकडो पक्ष्यांचे आगमण या ठिकाणी झाले. यात फ्लेमिंगो जास्त असल्याने लक्ष वेधून घेत आहेत. उजनी धरण परिसरातील बॅकवॉटरमध्ये विशेषतः कुंभारगाव परिसरात मोठ्या संख्येने फ्लेमिंगोचे थवे दिसून येत आहेत.

जानेवारीच्या सुरुवातीला जलपातळीत झालेल्या चढ-उतारामुळे पक्ष्यांचे दर्शन मर्यादित होते. मात्र, आता पक्ष्यांची संख्या हळूहळू वाढत असून फेबुवारी आणि मार्च महिन्यात फ्लेमिंगोंची सर्वाधिक उपस्थिती अपेक्षित आहे. याच काळात विविध स्थलांतरित पक्ष्यांचाही वावर वाढणार आहे.

पर्यटकांची संख्या वाढली

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिगवण येथे दरवर्षी निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पक्षीनिरीक्षक मोठ्या संख्येने भेट देतात. स्थानिक बोट सफारी पुन्हा सुरू झाल्या असून, पर्यटकांना फ्लेमिंगो व इतर जलपक्षी जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होत आहे. तज्ज्ञांच्या मते, पहाटे व सायंकाळच्या वेळेत पक्ष्यांची हालचाल अधिक होते. त्यामुळे पक्षीदर्शन आणि छायाचित्रणासाठी हा कालावधी सर्वोत्तम ठरतो. आगामी आठवड्यांत पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT