पुणे : जागतिक पाणथळ दिनानिमित्र (भिगवण) केलेल्या वार्षकि पक्षीगणनेत 137 प्रजातींच्या एकूण 6,604 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने फ्लेमिंगो मात्र यावर्षी अदृश्य असल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे.
वनविभाग सोलापूर आणि ‘वाइल्डलाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने 1 फेबुवारी रोजी ही गणना करण्यात आली. या गणनेनुसार प्रजातींच्या 5,550 पाणपक्ष्यांचा समावेश आहे. मात्र, यावर्र्षी धरणातील वाढीव पाणी पातळीमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेले फ्लेमिंगो (रोहित) पक्षी अद्याप तरी गणनेत दिसून आलेले नाहीत.
या पक्षीगणनेत पुणे आणि सोलापूर येथील 29 स्वयंसेवकांनी जलाशयाच्या 9 विविध स्थळांवर जाऊन ही निरीक्षणे नोंदवली आहेत. या गणनेतून मिळालेली माहिती ‘एशियन वॉटरबर्ड सेन्सस’ कडे पाठवली जाणार आहे. यावर्षी सर्वेक्षणात ‘मोठा ठिपकेदार गरुड’ आणि ‘नदी सुरय’ यासारख्या दुर्मळि पक्ष्यांचे दर्शन झाले आहे. ‘ब्लॅक-टेल्ड गॉडविट’ आणि ‘पॅलिड हॅरियर’सारख्या संकटसदृश प्रजातींचीही नोंद करण्यात आली.
उजनी जलाशय हे पक्ष्यांसाठी नंदनवन मानले जाते, जिथे दरवर्र्षी बार-हेडेड गूस, नॉर्दर्न शॉवलर आणि विविध प्रकारचे शिकारी पक्षी हजेरी लावतात. या वार्षकि गणनेमुळे येथील परिसंस्थेच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. या सर्वेक्षणात 137 प्रजातींच्या 6,604 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. उजनीसारख्या महत्त्वाच्या पाणथळ क्षेत्राचे संवर्धन आणि निरीक्षण करण्यासाठी याचा मोठा उपयोग होईल, अशी अपेक्षा पक्षीमित्रांनी व्यक्त केली आहे.
या पक्षी गणनेदरम्यान 480 भारतीय पाणकावळ्यांचा एक मोठा थवा आकाशात झेपावताना दिसला असून जे या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. 2025 मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी यंदा अधिक आहे. फ्लेमिंगोसारख्या पक्ष्यांना अन्नाच्या शोधासाठी उथळ पाण्याची गरज असते. पाणी खोल असल्यामुळे हे पक्षी या भागात दिसून आले नाहीत. पाणी पातळी कमी होईल, तसतशी पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यता पक्षिमित्रांनी व्यक्त केली आहे.