Bhandarkar Institute Exhibition Pudhari
पुणे

Bhandarkar Oriental Research Institute Exhibition: भांडारकर संस्थेच्या ‘ज्ञानसागर’ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांची अलोट गर्दी

प्राचीन हस्तलिखिते आणि दुर्मीळ दस्तऐवजांचा खजिना सर्वांसाठी खुला; महापौरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील प्राचीन दस्तऐवजांचा खजिना सर्वांसाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने शनिवारी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी अलोट गर्दी करून प्रदर्शन पाहण्याचा आनंद लुटला. शहराच्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीनदिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या संग््राहातील महत्त्वाची हस्तलिखिते, ग््रांथ आणि मौल्यवान वस्तूंचा तसेच संशोधन प्रकल्पांचा समावेश असलेल्या ‌‘ज्ञानसागर‌’ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी झाले. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, ऑलिम्पिकपटू नेमबाज अंजली भागवत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले, संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीप रावत व्यासपीठावर उपस्थित होते. भांडारकर संस्थेत येत्या सोमवारपर्यंत (23 फेबुवारी) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे समन्वयक मनोज एरंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन संस्थेचे निबंधक श्रीनन्द बापट यांनी केले. संतोष रासकर यांनी आभार मानले.

जाज्वल्य ठेवा जपण्याची गरज : महापौर

आपल्या देशाच्या जाज्वल्यपूर्ण अशा प्राचीन इतिहासाच्या दस्तऐवज, साहित्यांचे, स्मारकांचे संरक्षण आणि संवर्धन होण्याची मोठी गरज आहे; ज्यासाठी भांडारकरसारख्या संस्था वर्षानुवर्षे चिकाटीने काम करीत आहेत, असे मत या वेळी महापौर मंजूषा नागपुरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते ‌‘भीम‌’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

जगातील सर्वांत मोठे भांडार : अंजली भागवत

भांडारकर संस्थेच्या कार्याचा गौरव करताना अंजली भागवत म्हणाल्या की, जगातील सर्वांत मोठे भांडार असलेली तिजोरी म्हणजे भांडारकर संस्था आहे. या संस्थेकडे असलेला प्राचीन साठा बहुमूल्य आहे. ‌‘ज्ञानसागर‌’ प्रदर्शनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

तरुणांचा सहभाग वाढवा : फिरोदिया

या वेळी संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया म्हणाले की, संशोधनाच्या क्षेत्रात गेली 108 वर्षे कार्यरत असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या कार्यात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT