Scam Pudhari
पुणे

Credit Society Scam: चाकणमध्ये 6.5 कोटींचा पतसंस्था घोटाळा; 36 जणांवर गुन्हा

भैरवनाथ पतसंस्थेतील अपहारप्रकरणी अध्यक्ष, संचालकांसह मोठी कारवाई; पोलिसांकडून तपासाला वेग

पुढारी वृत्तसेवा

चाकण: साडेसहा कोटींपेक्षा अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ ग््राामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये संबंधित संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, सर्व संचालक, खेड बाजार समितीच्या माजी उपसभापतींसह, ग््राामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी असलेल्या तब्बल 36 जणांचा समावेश आहे. याप्रकरणी सहकारी संस्था, नागरी बँका विभागाच्या प्रथम विशेष लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे.

या पतसंस्थेत 6 कोटी 53 लाख 92 हजार 42 रुपयांचा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रामदास हिरामण कड, तुकाराम पिराजी टोपे, किसन सोपान गारगोटे, बाळासाहेब पंडित गारगोटे, रवींद्र नामदेव गारगोटे, अनिल गोविंद टोपे, शिवाजी बाबूराव जरे, काळूराम पांडुरंग टोपे, राजाराम किसन टोपे, सुरेश रंगनाथ लोखंडे, दत्तात्रेय वाल्मीक गोरे , शांताराम बापू जगताप, विमल बबन गारगोटे, रामदास ज्ञानेश्वर जाधव, गोरख भागुजी टोपे, सुरेखा लक्ष्मणराव टोपे, मारुती ज्ञानोबा गारगोटे, राहुल रामदास टोपे, दत्तात्रय संतू टोपे, अंकुश रामदास जरे, नीलेश हनुमंत टोपे, सुरेश शिवाजी टोपे, संतोष दत्तात्रय टिपरे, सुरेखा लहू गारगोटे, सुरेखा संजय टोपे, काळुराम लक्ष्मण गारगोटे, शिवाजी दगडू टोपे, सूरज लक्ष्मण टोपे, सुरेखा लक्ष्मण टोपे, सारिका रोहिदास गारगोटे, रोहिदास तुकाराम गारगोटे, सुरेखा सुरेश लोखंडे, अनिता काळुराम गारगोटे, विशाल दत्तात्रय पवळे, रामदास संतू टोपे ( सर्व जण रा. वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या 36 जणांची नावे आहेत. वाकी गावातील भैरवनाथ ग््राामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अपहाराचा हा संपूर्ण प्रकार सन 2013- 14 ते सन 2017- 18 या कालावधीत घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT