पुणे

सावधान ! अँटिबायोटिकचा अतिवापर करताय?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच अँटिबायोटिक औषधांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले. अँटिबायोटिकच्या अतिवापरामुळे शरीरामध्ये औषधांना प्रतिसाद न देण्याची क्षमता तयार होत आहे. त्यामुळे भविष्यात यकृत आणि मूत्रपिंड निकामी होणे, शरीरावर औषधांचा परिणाम न होणे, पोटाचा, आतड्याचा कॅन्सर, मल्टिऑर्गन फेल्युअर अशा दुष्परिणामांचा विळखा पडण्याची भीती वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

व्हायरल अर्थात विषाणूजन्य आजारांमध्ये अँटिबायोटिकचा उपयोग होत नाही. जिवाणूजन्य आजारांमध्ये अंँटिबायोटिक औषधे वापरली जातात. मात्र, व्हायरल आजारांमध्ये सर्रास ही औषधे दिली जात असल्याने शरीरातील चांगले (गट) बॅक्टेरियाही मारले जातात. त्यामुळे अपचन, पित्त, तसेच पोटाचे विकार उद्भवतात. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात म्हणाले, 'सध्या जगभरात सात अँटिबायोटिक वापरली जात आहेत.

ती आता निकामी ठरू लागली आहेत. पुढील तीस वर्षांत नवीन अँटिबायोटिक येणार नाहीत. अँटिबायोटिक संशोधनाला निधी मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे, अतिवापरामुळे बरेचदा शरीराकडून अँटिबायोटिक औषधांचा प्रतिसादच दिला जात नाही. त्यामुळे अँटिबायोटिक रेझिस्टन्स अर्थात अँटिबायोटिकला शरीराचा प्रतिसाद न मिळणे ही भविष्यात येऊ घातलेली महामारी ठरणार आहे.'
व्हायरल अर्थात विषाणूजन्य आजारांमध्ये अँटिबायोटिकचा उपयोग होत नाही.

जिवाणूजन्य आजारांमध्ये अंँटिबायोटिक औषधे वापरली जातात. मात्र, व्हायरल आजारांमध्ये सर्रास ही औषधे दिली जात असल्याने शरीरातील चांगले (गट) बॅक्टेरियाही मारले जातात. त्यामुळे अपचन, पित्त, तसेच पोटाचे विकार उद्भवतात. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात म्हणाले, 'सध्या जगभरात सात अँटिबायोटिक वापरली जात आहेत. ती आता निकामी ठरू लागली आहेत.

पुढील तीस वर्षांत नवीन अँटिबायोटिक येणार नाहीत. अँटिबायोटिक संशोधनाला निधी मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे, अतिवापरामुळे बरेचदा शरीराकडून अँटिबायोटिक औषधांचा प्रतिसादच दिला जात नाही. त्यामुळे अँटिबायोटिक रेझिस्टन्स अर्थात अँटिबायोटिकला शरीराचा प्रतिसाद न मिळणे ही भविष्यात येऊ घातलेली महामारी ठरणार आहे.'

काय काळजी घ्यावी?

  •  व्हायरल आजारांवर कोणती औषधे द्यावीत, याबाबत डॉक्टरांमध्ये जनजागृती आवश्यक
  • रुग्णांनी थेट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषधे घेऊ नयेत.
  • डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय औषध विक्रेत्यांनी अँटिबायोटिक औषधे न देण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी
  • लहान मुलांना सातत्याने अँटिबायोटिक देऊ नयेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT