प्रभाग क्रमांक १० मध्ये पाणीपुरवठा, रस्ता आणि पदपथांवरील अतिक्रमणे, पौड रोडवरील कचरा डेपोचे स्थलांतर, यासह विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. किनारा चौक, कोथरूड डेपो चौकात वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बावधन बुद्रुकचा महापालिकेत समावेश होऊन या भागाच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उजवी भुसारी कॉलनीतील उद्यानाचे काम अवर्धवट आहे.
लोकजागर
दीपक पाटील
बावधन बुद्रुकचा महापालिकेत समावेश केल्यामुळे प्रभाग १० मध्ये १४ ते १५ हजार मतदार वाढले आहेत. त्यात तीन ते साडेतीन हजार स्थानिक नागरिक आणि उर्वरित १० ते ११ हजार सोसायट्यांतील मतदारांचा समावेश आहे. या भागाच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
परिसरातील काही भागांत पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. तसेच, ड्रेनेजलाइनचा अभाव असल्याने सांडपाणी उघड्यावरून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या भागाचा महापालिकेत समावेश होऊनही रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. (Latest Pune News)
बावधन भागात नागरीकरण दिवसेंदिवस वाढत असून, मोठ्या सोसायट्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, परिसरातील रस्त्यांचा विकास होत नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला समोरे जावे लागत आहे. तसेच, राजकीय वरदहस्तामुळे या भागातील रस्त्यांवरील अतिक्रमणेही दिवसागणिक वाढत आहेत. प्रशासनाकडून या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडत आहे. रस्त्यांवरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. गेल्या काळात लोकप्रतिनिधींकडून या भागाचा पुरेसा विकास झाली नाही. तसेच, आता प्रशासकराजच्या काळातही प्रशासनाने या भागाला न्याय दिला नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे विकासाची गाडी रुळावर येणार कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बावधन परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे का हटविली जात नाहीत? जागोजागी अनधिकृत भाजी मंडई कशा काय सुरू आहेत? अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय राजरोसपणे कसे सुरू आहेत? वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार कधी? नाल्यांतून सांडपाणी का वाहते ? नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह का वळविले? डीपी रस्ते का रखडले? कोथरूड डेपो चौकाची वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार? यासह विविध प्रश्नांची उत्तरे माननीयांना प्रभागातील मतदारांना द्यावी लागणार आहेत.
किनारा चौकातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची समस्या
अनधिकृत भाजी मंडई आणि पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमणे
कोथरूड डेपो चौकात नित्याची वाहतूक कोंडी
एकलव्य कॉलेजजवळील अर्धवट डीपी रस्ता
पौड रोडवरील कचरा डेपो स्थलांतर
उजवी भुसारी कॉलनीतील गार्डन प्रकल्प
बावधन, चांदणी चौक परिसरात पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती
रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग
बावधन परिसरात सुसज्ज दवाखान्याचा अभाव
काही भागांत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा
बावधनच्या पाण्यासाठी ३० किलोमीटर जलवाहिनी टाकली
सव्र्व्हे नंबर २२ मध्ये डॉ. केशवराव हेडगेवार बहुउद्देशीय हॉल
लक्ष्मी दत्त चौक परिसरातील (सव्र्व्हे नं. ५४) कवी ग. दि. माडगूळकर उद्यान
चांदणी चौकात (सर्व्हे नं. ६७) पुणे शहरातील पहिले प्रशिक्षण केंद्र आणि अग्रिशमन केंद्र
पौड रोडवरील कचरा डेपोचे स्थलांतर
उजवी भुसारी कॉलनीतील गार्डन प्रकल्प
मुख्य रस्ते वाहतूक कोंडीतून मुक्त व्हावेत
बावधन बुद्रुक येथील जलवाहिली आणि ड्रेनेजलाइन
भुसारी कॉलनीतील उद्यानासाठी सतत पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. पदपथ, चांदणी चौकातील अग्निशमन केंद्रासाठी देखील पाठपुरावा केला. तसेच प्रभागातील विविध विकासकामे केली.अल्पना वरपे, माजी नगरसेविका
स्वामी विवेकानंद ई-लर्निंग स्कूल, डॉ. केशवराव हेडगेवार बहुउद्देशीय हॉल आणि कवी ग. दि. माडगूळकर उद्यानासह विविध विकासकामे केली. ह.भ.पं. तुकाराम गेणूजी वेडेपाटील आरोग्य केंद्र आणि चांदणी चौकात प्रशिक्षण केंद्र व अग्निशमन केंद्र सुरू केले.दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेवक
मोरया विहार परिसरात गेल्या २३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण केले. ३० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यासह विविध विकासकामांवर भर दिला.किरण दगडे, माजी नगरसेवक
कुंबरे टाऊनशिप येथे पंडित दीनदयाल हॉल, महात्मा सोसायटीत उन तसेच रस्त्यांसह विविध विकासकामे केलीश्रद्धा प्रभुणे, माजी नगरसेविका