ATM 
पुणे

Baramati ATM Cash Shortage: बारामतीत एटीएममध्ये ‘नो कॅश’; ग्रामीण अर्थकारण ठप्प

शेतकरी, मजूर, व्यापाऱ्यांना मोठा फटका; तातडीने रोख उपलब्धतेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यातील ग््राामीण भागामध्ये सध्या एटीएममध्ये रोख रकमेचा तीव तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी एटीएम मशिन बंद अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी ‌‘नो कॅश‌’चे फलक झळकत असल्याने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे. विशेषतः शेतकरी, मजूर आणि लहान व्यापारी वर्गाला या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

दररोजच्या व्यवहारांसाठी पैशांवर अवलंबून असलेल्या ग््राामीण भागातील नागरिकांना एटीएममधून पैसे मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. काही गावांमध्ये नागरिकांना त्यासाठी लगतच्या गावांत जावे लागत आहे. वेळ व इंधन खर्च करून तेथे गेल्यानंतरही तेथील एटीएममध्ये पैसे मिळतीलच याची खात्री उरलेली नाही. त्यामुळे इंधनाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाया जात असून, संताप व्यक्त केला जात आहे.

याशिवाय, शेतमाल विक्रीनंतर मिळालेल्या रकमेचा व्यवहार करणे, कामगारांचे वेतन देणे तसेच घरगुती खर्च भागवणे कठीण झाले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रोख रकमेची गरज अधिक असताना एटीएममध्ये ठणठणाट असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.

ग््राामीण भागात सध्या शेतकरी सोसायटीचे कर्ज नवे-जुने करण्याच्या मार्गात आहे. या पैशावरच त्याची वर्षभराची खते-बियाणे, औषधे तसेच अन्य देणी अवलंबून असतात. शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात यूपीआयद्वारे व्यवहार करीत नाहीत.

सध्या खत विक्रेत्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांकडे पैशाचा तगादा लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी बॅंकांकडे पैशाचा तगादा लावला आहे. आर्थिक व्यवहार फिरवा-फिरवीच्या या चक्रात सध्या ग््राामीण भाग अडकला आहे. याशिवाय रोख रक्कम काढण्यावरही बॅंकांकडून मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी, ग््राामीण अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित बँका आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून एटीएममध्ये नियमित रोख उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा, ग््राामीण भागातील आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रोख रकमेचा तुटवडा

विशेष म्हणजे, बॅंकांमध्येही रोख रकमेचा काही अंशी तुटवडा जाणवत आहे. नाव न छापण्याच्या अटीवर काही बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हालाच आवश्यक तेवढी रोख रक्कम मिळेनाशी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT