Baramati Accident Pudhari
पुणे

Baramati Accident: बारामतीत भीषण अपघात; आई-मुलीचा मृत्यू, पती व दोन वर्षांचा मुलगा गंभीर

पारवडी-कटफळ रस्त्यावर चुकीच्या दिशेने आलेल्या कारची दुचाकीला धडक; रुपाली व सान्वी कोकणे यांचा दुर्दैवी मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यातील पारवडी ते कटफळ मार्गावर चुकीच्या दिशेने आलेल्या वॅगनर मोटारीने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आई व मुलीचा मृत्यू झाला. रुपाली मयुर कोकणे (वय २५) व सान्वी मयुर कोकणे (वय ५, रा. पारवडी, ता. बारामती) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. रुपाली यांचे पती मयुर व या दांपत्याचा दोन वर्षांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

बुधवारी (दि. ४) रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अॅड. सचिन कोकणे यांनी फिर्याद दिली. त्यांचे चुलत भाऊर मयुर हे पत्नी व मुलगी आणि मुलासह दुचाकीवरून पारवडी येथील घराकडे निघाले होते.

यावेळी चुकीच्या दिशेने आलेल्या मोटार (एमएच-४२, बीजे-१४०४) वरील चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुपाली मयुर कोकणे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेतील सान्वी हिला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचाही दुदैवी मृत्यू झाला. मयुर कोकणे व त्यांचा दोन वर्षीय मुलगा हे ही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT