Woman Harassment Case  Pudhari
पुणे

Baramati Crime | बारामतीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची विधवा महिलेकडे शरीरसुखाची मागणी; फोटो व्हायरल करण्याची धमकी

नगरसेवक किशोर मासाळ विरुद्ध विनयभंग, मारहाण प्रकरणी गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Baramati Woman Harassment Case

बारामती : बारामतीत राष्ट्रवादीचा नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, बारामती) यांने महिलेच्या घरात घुसत तिच्याकडे वेळोवेळी शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकऱणी शहरातील एमआयडीसी भागातील तांबेनगर येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दाखल केली. १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, फिर्यादीची मासाळ याच्याशी ओळख होती.

तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर ती विधवा असल्याने तिच्या अबला असल्याचा फायदा घेत त्याने वेळोवेळी तिच्या राहत्या घरात अनाधिकाराने प्रवेश करत तिच्याकडे वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केली. तिच्या अंगाशी लगट करून, झोंबून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

मी स्थानिक नेता आहे, तुला इथे सुखाने जगू देणार नाही, माझ्या खूप ओळखी आहेत, तुम्हाला इथे सुखाने जगू देणार नाही, तुम्हाला नको नको करून ठेवीन, खोट्या गुन्ह्यात अडकवीन, तुझे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत. तु मी सांगेल तसे ऐक असे म्हणून मासाळ याने तिच्याकडे वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केली.

तसेच 'तु बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाही तर मी तुझे फोटो सोशल मिडियावर पाठवून तुझी बदनामी करून' अशी धमकी दिली. तिचा वेळोवेळी पाठलाग केला. तसेच तिला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT