Pudhari
पुणे

Pahalgam terror attack : बारामती दूध संघाचे संचालक मंडळ अडकले काश्मीरमध्ये

बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ अभ्यास दौऱ्यासाठी जम्मू-काश्मीरला गेले

पुढारी वृत्तसेवा

Tourist in pahalgam बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ अभ्यास दौऱ्यासाठी जम्मू-काश्मीरला गेले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हे संचालक मंडळ तेथे अडकले आहे. गुरुवारी (दि. २४) बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधत संचालक मंडळाच्या परतीच्या प्रवासाबद्दल माहिती घेतली.

बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक मंडळ यापूर्वी अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर बारामती तालुका दूध संघाचे संचालक मंडळ चक्क काश्मीरला अभ्यास दौऱ्यावर गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. बारामती तालुक्यात सहकारी संस्थांवर काम करणाऱ्या संचालकांचे असे अभ्यास दौरे दरवर्षी पार पडतात. त्यात साखर कारखान्यांसह अन्य संस्थांचाही समावेश असतो.

मंगळवारी काश्मीर पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर हे शिष्टमंडळ तेथेच अडकले आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत त्यांनी छत्रपती साखर कारखाना निवडणूकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी व्यस्त दिनक्रमातून त्यांनी दूध संघाच्या शिष्टमंडळासंबंधी माहिती घेतली. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील फोनद्वारे चर्चा केली.

आपल्या भाागात रेल्वेने येणाऱ्या नागरिकांनी मंत्री गिरीष महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच विमानाने येणाऱ्या नागरिकांनी मोहोळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांसाठी मुंबईत रात्रंदिवस खासगी सचिवांची नियुक्ती करण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सुचित केले.

दरम्यान, पवार यांच्या सूचनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने प्रत्येक दोन तासांनी अडकलेल्या लोकांच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत आहे. बारामती दूध संघाचे संचालक मंडळ शुक्रवारी परतणार असल्याची सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT