लोकअदालतीत साडेदहा कोटींची वसुली; बारामतीत 5348 खटले निघाले निकाली Pudhari
पुणे

Baramati Lokadalat Recovery: लोकअदालतीत साडेदहा कोटींची वसुली; बारामतीत 5348 खटले निघाले निकाली

एकूण 10 कोटी 46 लाख 9 हजार 587 रुपयांची वसुली

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 13) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल पूर्व व दाखल खटल्यामध्ये तडजोड होऊन एकूण 5348 खटले निकाली निघाले असून एकूण 10 कोटी 46 लाख 9 हजार 587 रुपयांची वसुली झाली.

बारामती जिल्हा न्यायालयाचे मुख्य जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे व सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने हे लोकन्यायालय पार पडले. (Latest Pune News)

लोकन्यायालयासाठी आठ पॅनेल तयार करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे, जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील, दिवाणी न्यायाधीश डी. एस. झंवर, सहदिवाणी न्यायाधीश एस. टी. चिकणे, श्रीमती व्ही. बी. पाटील, दिवाणी न्यायाधीश पी. पी. काळे, व्ही. व्ही. देशमुख, श्रीमती टी. डी. इंगवले यांनी वकिलांसह पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले.

बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे, उपाध्यक्ष ॲड. अनुप चौगुले, उपाध्यक्ष ॲड. हर्षदा जगदाळे, महिला प्रतिनिधी ॲड. मोनिका कोठावळे, ॲड. श्वेता वणवे, ॲड. विजय कांबळे, ॲड. बनसोडे यांच्यासह वकील संघटनेचे सदस्य या वेळी उपस्थित होते. विधी सेवा समितीचे समन्वयक म्हणून मिलिंद देऊळगावकर यांनी काम पाहिले.

लोकन्यायालयात बँकेच्या वसुलीचे 461 खटले निकाली निघाले. त्यात 5 कोटी 93 लाख 38 हजार 965 रुपयांची वसुली झाली. मोटार अपघाताच्या 23 खटल्यांमध्ये 2 कोटी 33 लाख 39 हजार 683 रुपये नुकसानभरपाई पक्षकारांना मिळाली. पाणी वसुली, महावितरण वसुली, महसूल वसुली असे एकूण 10 कोटी 46 लाख 9 हजार 587 रुपयांची वसुली झाली.

मोटार अपघातांत विमा कंपनीद्वारे मोठी भरपाई

एचडीएफसी या विमा कंपनीने दोन प्रकरणात एकूण 58 लाख 50 हजार रुपये इतकी भरपाई देण्यात आली. एका प्रकरणात ॲड. प्रदीप देशमुख यांनी एका पक्षकाराला 27 लाख 25 हजार नुकसानभरपाई मिळवून दिली. दोन्ही प्रकरणात विमा कंपनीद्वारे ॲड. विशाल बर्गे यांनी काम पाहिले. एचडीएफसी कंपनीच्या वतीने मंगेश इनामदार यांनी काम पाहिले.

वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीमध्ये खटले मिटवल्याने पक्षकारांची वेळेबरोबर पैशांचीदेखील बचत होते. तसेच न्यायालयातील हेलपाटे वाचतात. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीने खटले मिटवावेत.
व्ही. सी. बर्डे, मुख्य जिल्हा न्यायाधीश, बारामती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT