Petrol Pump Pudhari
पुणे

Baramati Cooperative Petrol Pump: बारामती खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपाची विक्रमी कामगिरी; सलग सहा महिने प्रथम क्रमांक

बारामती एमआयडीसीतील पंपाने दर्जेदार सेवेमुळे मिळवला मानाचा तुरा

पुढारी वृत्तसेवा

बारामती: सहकार क्षेत्रात आपला ठसा ‌‘बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेच्या बारामती एमआयडीसी येथील पेट्रोल पंपाने पेट्रोलियम कॉर्पोरेशन पूर्व सलग गेल्या सहा महिन्यांपासून विक्रमी विक्री नोंदवत क्रमांक पटकावला आहे. याबाबतची माहिती संघाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र माने, उपाध्यक्ष नितीन देवकाते व व्यवस्थापक नीलेश लोणकर यांनी दिली.

ग््रााहकांना देण्यात येणारी दर्जेदार सेवा आणि या जोरावर या पंपाने हे यश संपादन केले आहे. बारामती औद्योगिक वसाहतीतील वाहनांची वर्दळ आणि परिसरातील ग््रााहकांचा वाढता विश्वास यामुळे विक्रीचा आलेख राहिला आहे. कंपनीच्या वतीने या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेण्यात आली असून, यामुळे सहकारी संस्थांच्या व्यावसायिक सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशाबद्दल बोलताना संस्थेने सांगितले की, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन तसेच ग््रााहकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले आहे. येणाऱ्या काळातही ग््रााहकांना अद्ययावत सुविधा आणि पारदर्शक सेवा देण्यास आम्ही आहोत. बारामती खरेदी-विक्री संघाची स्थापना मध्ये झाली. वार्षिक कोटींची संघाची उलाढाल आहे. संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती औषधे, रासायनिक खते यांचे व्यवसाय करते, त्याच बरोबर मेडिकल व्यवसाय, व्यवसाय आणि सीएनजी पंप देखील संघाचे असून त्यांचा देखील व्यवसाय करत आहे. यामधून गुणवत्तापूर्ण सेवा ग््रााहकांना दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT