पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या खासगी ठेकेदारांच्या चालकांनी शुक्रवारी पुकारलेला संप अद्यापपर्यंत मिटलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. हे हाल थांबविण्यासाठी पीएमपी चालकांनी तातडीने संप थांबवावा, असे आदेश राज्याच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पत्रकाद्वारे दिले. पगारात वाढ न दिल्याने शुक्रवारी ट्रॅव्हल टाईम कंपनीकडील 200 चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे शुक्रवारी प्रवाशांचे हाल झाले. मात्र, शनिवारी पीएमपी प्रशासनाने त्यांच्याकडील चालकांच्या सुट्ट्या रद्द करून पुणेकर प्रवाशांना सेवा पुरवली. त्यामुळे पीएमपीच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान कोथरूड डेपोकडील ट्रॅव्हलटाईमच्या चालकांचा संप मिटला आहे. मात्र, ट्रॅव्हलटाईम या ठेकेदाराकडील पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील चालकांनी संप अद्याप मागे घेतलेला नाही. तो संप महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2023 चे कलम 2 चा खंड (क) चा उपखंड (एक) व (पाच) यासह कलम 4 चे पोट-कलम (1) मधील तरतुदीच्या अधीन राहून या कंत्राटी चालक कर्मचार्यांच्या संपास दिनांक 26 ऑगस्ट 2023 पासून मनाई करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे संपातील चालकांनी तातडीने कामावर हजर व्हावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :