पुणे

पुणे: नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील आर्वी फाटा येथे महिलेवर धारदार शस्त्रांनी हल्ला

अविनाश सुतार

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील आर्वी फाटा येथे टपरी चालवणाऱ्या एका महिलेवर चार जणांनी धारदार हत्यारांनी वार करून जखमी केले. ही घटना आज (दि. ७) दुपारी २.१५ वाजता घडली. हा हल्ला कौटुंबिक वादातून घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले  आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. जखमी महिलेवर  नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शांताबाई मारुती शिंदे (वय ४८) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.  शैलेश बापू लोखंडे, जयेश अशोक शिंदे (रा. सिन्नर), प्रकाश शंकर शिंदे (रा. साकुर), विशाल अण्णासाहेब शिंदे (रा. राहुरी) यांनी हा हल्ला केला असल्याची माहिती हल्ल्यात जखमी झालेल्या महिलाचा मुलगा अविनाश शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आर्वी फाट्याजवळ शांताबाई शिंदे यांचे गोळ्या-बिस्किट व इतर साहित्य विक्रीची टपरी आहे. आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास चार जणांनी दुचाकीवरून येऊन शांताबाई शिंदे यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली. ती कागदपत्रे त्यांनी देण्याचे नाकारले असता त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर टपरीमधील गल्ल्यातील ३५० रुपये घेऊन हल्लेखोरांनी पोबारा केला. जखमी महिलेची अवस्था पाहून तिला प्रथम ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT