पुणे : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर झुबेर इलियास हंगरगेकर (वय 37, रा. पोकळे मळा, कोंढवा) याला अटक केली. चौकशीदरम्यान, आता झुबेरकडे एके- 47 इंस्पायर मॅगझिन (पुस्तिका) सापडल्याची माहिती दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना सूत्रांनी दिली.(Latest Pune News)
झुबेर हा पेशाने संगणक अभियंता असून त्याने बी. टेक. पदवी घेतली आहे. तो मूळचा सोलापूरमधील असून, तो त्याच्या पत्नीसोबत कोंढव्यात राहात आहे. तो मागील 15 वर्षांपासून पुण्यात आहे. तो गेल्या काही दिवसांपासून शेख ओसमाबिन लादेनच्या बंदी असलेल्या अल- कायदा या दहशतवादी संघटनेच्या साहित्याच्या संपर्कात आल्याचे व त्याच्याशी संबंधित भाषांतरित साहित्य मिळाले आहे, त्यामुळे त्याला अटक केली आहे. दरम्यान, झुबेरकडे मिळालेल्या मोबाईलमधील पीडीएफ फाईलमध्ये सुरुवातीला एटीएसला आयईडी (इन्प्रव्हाईज एक्स्लोझिव्ह डिव्हाईस) म्हणजेच बॉम्ब तयार करण्याचा फॉर्म्युला आढळून आला होता. त्यानंतर आता त्याच्याकडे एके 47 इंस्पायर मॅगझिन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच त्याच्याकडे मिळून आलेल्या बॉम्ब तयार करण्याच्या फॉर्म्युल्याचा वापर करून कोठे बॉम्ब तर तयार केले नाहीत ना ? तसेच दरम्यानच्या कालावधीत तो देशासह परदेशात फिरला आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम एटीएसकडून सुरू आहे. दरम्यान, झुबेरच्या झडतीत एटीएसच्या हाती एक मॅगझिन (पुस्तिका) लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याने हे मॅगझिन कुठून मिळवले, कोणाकडून विकत घेतले किंवा गुप्त नेटवर्कद्वारे आणले का, याचा तपास पोलिस करत आहेत. त्या मॅगझिनचा उपयोग त्याने देशविरोधी कारवाईसाठी केला का? त्याने तरुणांना देशविरोधी कारवाईस प्रेरित केले का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
अल-कायदा इन सब कॉनटीनेट अँड ऑल मेनिफेसशन (जागतिक बंदी असलेल्या संघटनेचा प्रमुख) ओसामा बिन लादेन याच्या ईद-उल- फितरत दिवशीचे भाषांतर सापडले आहे. त्याचेकडे मिळालेल्या एके- 47 पुस्तिकेत ट्रेनिग एके-47 बद्दल माहिती मिळाली आहे. त्यासोबत वेगवेगळ्या फायरिंगचे फोटोदेखील सापडले आहेत.