पंढरपूर आषाढी वारीसाठी पुणे विभागातून ३२५ जादा एसटी गाड्यांची सोय pudhari photo
पुणे

Pandharpur Wari: पंढरपूर आषाढी वारीसाठी पुणे विभागातून ३२५ जादा एसटी गाड्यांची सोय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून एकूण ३२५ जादा बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. भाविकांना सुकर आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे.

प्रादेशिक कार्यालयाकडुन या वर्षी नागपूर व अमरावती विभागाच्या १५० बस पुणे विभागाला वाहतूक करण्यासाठी मिळणार आहेत. या बस नवमीला म्हणजेच दि.०४ जुलै २०२५ रोजी रात्री मुक्कामी स्वारगेट बसस्थानकावर पोहचतील व दि.०५ जुलै २०२५ (दशमी) रोजी दुपारी १२.०० वाजेनंतर स्वारगेट-पंढरपूर मार्गावर वाहतूक करतील. (Latest Pune News)

दि.०६ जुलै २०२५ रोजी नागपूर व अमरावती विभागाची १५० बस एकादशीच्या दिवशी पुणे परतीच्या वाहतूकीसाठी प्रस्थान करतील. त्याचप्रमाणे पुणे विभागाअंतर्गत असलेल्या १४ आगारांकडुन ३२५ बसचे नियोजन पंढरपुर यात्रेकरीता करण्यात आले आहे.

पुणे विभागाचे आगारांनुसार असे आहे जादा बसचे नियोजन...

१)शिवाजीनगर-३०

२)स्वारगेट-३०

३)भोर-२०

४)नारायणगाव-२५

५)राजगुरूनगर-२५

६)तळेगाव-२०

७)शिक्रापूर-२५

८)बारामती-३५

९)इंदापूर-२७

१०)सासवड-१८

११) दौंड-२०

१२)पिंपरी-चिंचवड-२०

१३)एमआयडीसी-२०

१४)मंचर-१०

- एकूण- ३२५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT