Asha Bhosale Pune property latest update Pudhari Photo
पुणे

Asha Bhosle Pune House: आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट 6.15 कोटींना विकला

Asha Bhosale Pune property latest update: 'सीआरई मॅट्रिक्स'ने दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार पुण्यातील Real estate मधील एका यशस्वी गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आपल्या सुरांनी रसिकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी रिअल इस्टेटमध्येही मोठी कमाई केली आहे. आशा भोसले आणि त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी पुण्यातील मगरपट्टा सिटीजवळील एक आलिशान अपार्टमेंट तब्बल 6.15 कोटी रुपयांना विकले आहे. मालमत्ता नोंदणीची कागदपत्रे तपासणाऱ्या 'सीआरई मॅट्रिक्स' या संस्थेने ही माहिती दिली आहे.

Real estateमधील यशस्वी गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण

'सीआरई मॅट्रिक्स'ने दिलेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांनी हा फ्लॅट फेब्रुवारी 20213 मध्ये 4.33 कोटी रुपयांना खरेदी केला होता. सुमारे साडेअकरा वर्षांनंतर या फ्लॅटच्या विक्रीतून त्यांना गुंतवणुकीवर तब्बल 42 टक्के इतका घसघशीत परतावा मिळाला आहे. हा व्यवहार रिअल इस्टेटमधील एका यशस्वी गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

फ्लॅटची वैशिष्ट्ये आणि व्यवहार

हा आलिशान फ्लॅट पुण्यातील 'पंचशील वन नॉर्थ' या प्रतिष्ठित इमारतीत 19व्या मजल्यावर आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 3401 चौरस फूट, टेरेस 182 चौरस फूट, 5 कार पार्किंगची जागा काही या फ्लॅटची खास वैशिष्ट्ये आहेत. पुण्यातील प्रेरणा गायकवाड आणि संग्राम गायकवाड यांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे. मिळालेल्या कागदपत्रांनुसार, या व्यवहाराची नोंदणी 14 जुलै 2024 रोजी झाली आहे. यासाठी खरेदीदारांनी 43 लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क (Registration Fee) भरले आहे.

पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारावर एक नजर

पंचशील रिॲलिटीने बांधलेली ही इमारत पुणे विमानतळापासून सुमारे 9 किमी, खराडी आयटी हबपासून 6 किमी आणि हिंजवडी आयटी पार्कपासून 25 किमी अंतरावर आहे. मोक्याच्या ठिकाणी असल्याने या परिसरातील मालमत्तांना नेहमीच मोठी मागणी असते. गेरा डेव्हलपमेंट्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पुणे रिअल इस्टेट बाजारात घरांच्या विक्रीत वार्षिक 8 टक्क्यांची घट झाली असली तरी, घरांच्या सरासरी किमतीत 7.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. अशा संमिश्र परिस्थितीतही आशा भोसले यांच्या मालमत्तेला मिळालेली किंमत लक्षणीय मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT