पुणे

राष्ट्रवादीचा ‘कंट्रोल’; भाजपची गळचेपी

अमृता चौगुले

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या सत्तेत अजित पवार यांचा समावेश झाल्याने ग्रामीण पोलिस, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी तसेच तालुका महसूल कचेर्‍यांत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटाचा आता थेट हस्तक्षेप वाढल्याने जिल्ह्यातील मोजकीच ताकद असलेल्या भाजपला आता आपल्याच सत्तेच्या पॅटर्नमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यातील सत्ताकेंद्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे कार्यरत होऊ लागल्याने भाजपचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचे अधिपत्य आता उतरणीला लागल्याचे चित्र आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या पक्षाची पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रशासनात अस्तित्वाची शकले निघू लागली आहेत. राज्यातील सत्ता समीकरणांची घडी बसविताना भाजपने राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेतले खरे, परंतु सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळविण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाची सूत्रे सांभाळण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनात राष्ट्रवादीला वाढलेले झुकते माप व भाजपच्या मंडळींना झुकते माप हा बदलत्या सत्ता समीकरणातील वस्तुपाठ आता पुढे येत आहे.

पुणे शहरातील महापालिका, पुणे पोलिस आयुक्तालयातील बैठकांपाठोपाठ आता ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या पुणे ग्रामीण पोलिस, पुणे जिल्हा परिषद , पीएमआरडीए, कृषी व सहकार कार्यालये राष्ट्रवादीच्या हस्तक्षेपात कामकाज करीत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राबता वाढू लागला आहे. ग्रामीण भागातील 'शासन आपल्या दारी' उपक्रमानंतर जिल्ह्यातील सत्ताकेंद्रातील सत्तेच्या कवचाकडे भाजपने फारसे गांभीर्याने न पाहिल्याने भाजपच्या पत्रांना आता जिल्हा प्रशासन फारसे गांभीर्याने घेत नसल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

सुपे सुरू; उरुळी कांचन पोलिस ठाणे मात्र रेंगाळले
पुणे जिल्ह्यात सत्ता समीकरणे बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात बारामती तालुक्यात प्रवेश करतानाच तालुक्यातील सुपे या नव्या पोलिस ठाण्याची निर्मितीचा निर्णय अगदी दोन दिवसांत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. या उलटची परिस्थिती पोलिस ठाण्याची आहे. मुख्य गरज असलेल्या हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलिस ठाणे व दौंड महसूल उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी मात्र अडीच वर्षे उलटून पूर्ण होऊ शकली नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT