पुणे

Pune News : तब्बल 10 लाखांचा गुटखा पकडला

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : गुजरातहून पुणे येथे प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणारा मालवाहू ट्रक आळेफाटा पोलिसांनी नाकाबंदी करत असताना पकडून गुटख्यासह ट्रक असा 29 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये गुटख्याची किंमत 9 लाख 54 हजार रुपये आहे. या प्रकरणी एक जणास अटक करण्यात आले असून, ही कारवाई सोमवारी (दि. 20) मध्यरात्रीनंतर करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली. अल्ताफ नूरमहम्मद शेखा (वय 43, रा. मोती बाजार, ता. गोंदल, जि. राजकोट) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

संबंधित बातम्या :

आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नाकाबंदी करत असताना पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे, पोलिस जवान अमित माळुंजे, नवनीत अरगडे, हनुमंत ढोबळे, राजेंद्र आमले व पंकज पारखे यांच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, ट्रक (जीजे 03 एटी 3510) यामधून बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असून, हा ट्रक गुजरातहून पुण्याकडे जाणार आहे. या अनुषंगाने पोलिस पथक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंडी येथे हॉटेल फाउंटनसमोर गेले व तेथे त्यांना हा ट्रक संशयीतरीत्या मिळून आला. ट्रकचालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यामुळे ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीररीत्या सुगंधित सुपारीची 20 खाकी पोती व निळ्या कलरचे एकूण 4 पोती तंबाखू असा एकूण 9 लाख 54 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला. या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग मोशी, पुणे यांना कळवून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अल्ताफ नूरमहम्मद शेखा याच्याविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे व आळेफाटा पोलिस पथकाने केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT