Cyclone Arnab representative image
पुणे

Arnab Cyclone: ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बंगालच्या उपसागरात सोमवारी तयार झालेले ‘अर्णब’ चक्रीवादळ मंगळवारी अधिक तीव्र झाले. बुधवारी (दि. २८) त्याचा वेग ताशी १२५ ते १३० किमी वेगाने वाढून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता असून राज्यातील इतर भागांत मात्र हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार अर्णब चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील बापटला आणि विशाखापट्टणम यादरम्यान किनारपट्टीवर बुधवारी सकाळी समुद्रात जमिनीकडे येण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २८ व २९ ऑक्टोबरदरम्यान विदर्भातील अनेक भागांत तसेच मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दि. ३० रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रासाठी अलर्ट

(२८ ऑक्टोबर) ऑरेंज अलर्ट : गडचिरोली. यलो अलर्ट : कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली. (२९ ऑक्टोबर) यलो अलर्ट : नंदूरबार, धुळे, नाशिक, रायगड, सातारा घाट, पुणे घाट, रत्नागिरी, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. (३० ऑक्टोबर) यलो अलर्ट : नाशिक, अहिल्यानगर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT