पुणे

इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायचा प्लॅन आहे…मग या ५ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

अमृता चौगुले

पुणे : पुढरी वृत्तसेवा

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची सध्या खूप क्रेझ वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी, 2021मध्ये मोठया प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्यात आली आणि आता 2022 मध्ये देखील बरीच इलेक्ट्रिक वाहने लाँच होणार आहेत. याचे कारण म्हणजे आता इलेक्ट्रिक वाहनांवर राज्य सरकारकडून सबसिडी दिली जात आहे. उत्तम बॅटरी बॅकअप आणि नवीन वैशिष्ट्य यामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक बाईक घ्यायचा विचार करत असाल, तर या पाच गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

अनुदानित दुचाकी वाहने

केंद्र आणि राज्य सरकारांकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि वापरावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल तर त्याची किंमत जाणून घ्या आणि त्यावर किती सबसिडी दिली जात आहे हे देखील जाणून घ्या. सुधारित FAME-II नुसार बॅटरी क्षमतेच्या प्रति kWh १५०० रुपये सबसिडीचा लाभ मिळणार आहे.

या आहेत ऑफर्स.

तुम्ही तुमच्या बजेटनुसार इलेक्ट्रिक वाहन निवडू शकता. त्याच बरोबर अनुदानाचा हिशेबही करता येईल. सध्या गुजरात सरकार प्रति Kwh १०,००० रुपये लाभ देत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राने मार्च २०२२ पर्यंत १.५ लाख रुपयांपर्यंतची प्रोत्साहन योजनाही सुरू केली आहे. राजस्थान सरकार देखील इर्लेक्ट्रिकल व्हेहीकल खरेदीदारांना लाभ देत आहे.

रेंज म्हणजे नक्की काय?

इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करताना 'रेंज' हा एक तुमचा महत्त्वाचा मुद्दा असेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ईव्ही निवडू शकता, ज्यामुळे तुम्हाला कमी किमतीत चांगली रेंज मिळते. जर तुम्हाला लांब पल्ल्यासाठी इलेक्ट्रिक वाहन घ्यायचे नसेल, तर तुम्ही कमी बजेटमध्ये ८० किमी पेक्षा कमी रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर निवडू शकता.

चार्जिंग आणि बॅटरी

भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट्सही वेगाने वाढत आहेत. ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी आणि टॉर्क मोटर्स सारख्या कंपन्या अनेक शहरांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स स्थापित करत आहेत. त्यामुळे तुम्ही सहज चार्ज होणारी इलेक्ट्रिक स्कूटर निवडावी किंवा तुम्ही घरच्या चार्जरने चार्ज होणारे इलेक्ट्रिक वाहन निवडू शकता. याशिवाय, तुम्ही काढता येण्याजोग्या बॅटरीसह इलेक्ट्रिक वाहनाची निवड करू शकता. याचा फायदा असा आहे की तुम्ही बॅटरी काढून ती वेगळी चार्ज करू शकता.

आपले वाहन सुरक्षित आहे का?

याशिवाय, तुम्ही रस्त्यावर वाहनाच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले पाहिजे. ब्रेकडाउन झाल्यास किंवा तुमच्या गाडीचे चार्जिंग संपल्यास, तुम्ही नेहमी तुमच्या डीलरशिप / ईव्ही कंपनीला कॉल करू शकता आणि त्यांना वाहन जवळच्या सेवा / चार्ज स्टेशनवर नेण्यास सांगू शकता. टिव्हिएस, ओला इलेक्ट्रिक आणि इतर अनेक कंपन्या सबस्क्रिप्शनच्या आधारावर त्यासाठी समर्थन देतात.

फीचर्सवर लक्ष दिले पाहिजे

जवळजवळ सर्व इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये तुमच्या गरजेपेक्षा जास्त फिचर्स आहेत. रायडिंग मोड, रिव्हर्स असिस्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखी प्रमुख फिचर्स सामान्य असली तरी, त्यात वॉक मोड, क्रूझ कंट्रोल आणि वैशिष्ट्यपूर्ण मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे सज्ज आहेत. ज्याकडे आपण काळजीपूर्वक पाहिले पाहिजे.

SCROLL FOR NEXT