पुणे

एक शपथ अशीही ! विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

Laxman Dhenge

मंचर : पुढारी वृत्तसेवा : जवळे (ता. आंबेगाव) येथे अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहाची मिरवणूक निघाली. फेटे बांधलेले वराती लग्नासाठी सोबत होतेच. सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत करण्यात आले. लग्नघटिका समीप आली असताना वर-वधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकले. त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

विवाहात ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरामोठ्यांचा मान ठेवण्याचा, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला. त्याचे पालन करण्याचा निश्चय करतानाच देशाविषयीचे कर्तव्य म्हणून मतदान करणार असल्याचे सांगितले. नव्या संसाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प करून नवविवाहित जोडप्याने करून एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला.
जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहाची तयारी सुरू कसताना नवरदेवाची स्वारीही आली. अशात स्वीप पथकाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी वर्‍हाडी मंडळीला मतदानाचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथक मतदारसंघात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करीत आहे. जवळे गावात विवाहाच्या मिरवणुकीत मतदार जनजागृती करून वर-वधू आणि वर्‍हाडी मंडळींना मतदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी सर्वांनी मतदान संकल्पपत्र भरू दिले. या उपक्रमात स्वीप सदस्य नारायण गोरे, सुनील भेके, सचिन तोडकर, तुषार शिंदे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT