Amit Thackeray Removes PM Modi’s Photo: मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान ते विविध महाविद्यालयांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी, महाविद्यालयातील समस्या आणि विविध सुविधांबाबत ते माहिती घेत आहेत. याच दौऱ्यात शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात घडलेल्या एका प्रकाराची सध्या चर्चा सुरू आहे.
अमित ठाकरे यांनी महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांनी हा फोटो पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांना तो काढण्यास सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी लावला आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर महाविद्यालयातील हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे. अमित ठाकरे यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळातही चर्चा होत आहे.
अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देण्याचा कार्यक्रम आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत असून, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
शिवाजीनगर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला भेट देताना त्यांनी महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा आणि इतर समस्यांबाबत प्राचार्यांशी चर्चा केली.
याच चर्चेदरम्यान प्राचार्यांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी लावलेला नरेंद्र मोदींचा फोटो अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तो फोटो काढण्यास सांगितल्याचे समोर आले आहे.
अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान ते एकूण सात महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित अडचणी, महाविद्यालयातील सुविधा आणि इतर समस्या समजून घेण्यावर या दौऱ्यात भर देण्यात येत आहे.
दरम्यान, शिवाजी महाराजांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरून अमित ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवाजीनगर येथील महाविद्यालयातील हा प्रकार सध्या चर्चेत आला आहे.