आरोग्यसेवेसाठी बारा वर्षांत तिप्पट बजेट: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  File Photo
पुणे

Health Budget: आरोग्यसेवेसाठी बारा वर्षांत तिप्पट बजेट: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पीएचआरसी सेंटरचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

Amit Shah on health sector spending

पुणे: स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, मिशन इंद्रधनुष्य अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शासनाने आरोग्यसेवेचे बळकटीकरण केले आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 2013 मध्ये 37 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

यंदा तरतूद 1 लाख 33 हजार कोटींपर्यंत वाढविण्यात आली आहे. आरोग्यसेवेसाठी बारा वर्षांत अर्थसंकल्पातील तरतूद तीनपट वाढविण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. (Latest Pune News)

वडाची वाडी येथे पूना लाइफस्पेस इंटरनॅशनल सेंटरचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. या वेळी कोनशिलेचे अनवारणही करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह सेंटरचे विश्वस्त देवीचंद जैन, राजकुमार चोरडिया, पुरिषोत्तम लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.

शहा म्हणाले, ’बाळ आईच्या गर्भात असल्यापासून किशोरवयीन होईपर्यंत आरोग्य कवच मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजनांच्या माध्यमातून काम करीत आहेत. गर्भवती महिलांना लाभ, लहान मुलांचे लसीकरण, जनतेचा आरोग्य विमा, आरोग्यसेवेसाठी पायाभूत सुविधा यावर विशेष भर दिला जात आहे.

शासनाने 730 इंटिग्रेटेड लॅब आणि 602 क्रिटिकल केअर बॉक्स स्थापन केले आहेत. वैद्यकीय शिक्षणाच्या सीट दुप्पट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर वर्षी 1 लाख 18 हजार डॉक्टर बाहेर पडत आहेत. त्यामुळे रुग्णसेवेला गती मिळत आहे.’

बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोंढवा बुदुक येथील बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी केली. या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यातील 300 खाटांच्या रुग्णालयाचे कामकाज 2026 च्या एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आरएसएसचे मनोज पोचट आदी उपस्थित होते.

पीएचआरसी सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. तब्बल 14 एकर जागेत मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर उभे राहत असल्याने 6000 विद्यार्थी शिक्षण घेतील. तसेच, 2000 डॉक्टर आणि प्राध्यापक अध्यापन आणि रुग्णसेवा करतील. मारवाडी आणि गुजराती लोकांनी या माध्यमातून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत, ही कौतुकाची बाब आहे.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT