Amazon Pudhari
पुणे

Amazon: ॲमेझॉनचा मोठा निर्णय; कमी किमतीच्या वस्तूंवर रेफरल शुल्क रद्द, ऑनलाइन विक्रेत्यांना होणार फायदा

Amazon zero referral fee: Amazon ने ₹1000 पेक्षा कमी उत्पादनांवर Zero Referral Fee लागू करून विक्रेत्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक विक्रेत्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Amazon zero referral fee: भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रासाठी Amazon ने मोठी घोषणा केली आहे. 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर ‘Zero Referral Fee’ लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात आधीच Amazon वर 2 लाखांहून अधिक विक्रेते सक्रिय आहेत आणि नव्या विक्रेत्यांच्या नोंदणीत दरवर्षी तब्बल 75 टक्क्यांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शुल्क माफीचा निर्णय विक्रेत्यांसाठी गेमचेंजर ठरू शकतो.

या नव्या धोरणानुसार, 1,000 रुपयांखालील उत्पादनांवर कोणतेही रेफरल शुल्क लागणार नाही. याशिवाय 300 रुपयांखालील उत्पादनांच्या ‘Easy Ship’ शुल्कात 20 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे विक्रेत्यांचा एकूण खर्च 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

या बचतीचा फायदा विक्रेत्यांना पुन्हा गुंतवणुकीसाठी होणार आहे. नवीन उत्पादने बाजारात आणणे, स्पर्धात्मक किंमती देणे आणि ग्राहकवर्ग वाढवणे यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

Amazon ने या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला आहे. पूर्वी 1.2 कोटी उत्पादनांवर लागू असलेली ही सवलत आता 12.5 कोटींहून अधिक उत्पादनांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये फॅशन, होम डेकोर, किचन उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅक्सेसरीज यांसारख्या लोकप्रिय श्रेणींचा समावेश आहे.

Amazon India चे प्रॉडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर विक्रम देशपांडे यांनी सांगितले की, पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकसारख्या शहरांतील विक्रेत्यांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विक्रेते शुल्कातून वाचलेली रक्कम पुन्हा व्यवसायात गुंतवत असून त्यांच्या उत्पादनांची श्रेणी वाढवत आहेत.

यासोबतच Amazon विक्रेत्यांसाठी AI-आधारित साधने देखील उपलब्ध करून देत आहे. ‘Seller Assistant’ सारख्या टूलद्वारे किंमत, लिस्टिंग, जाहिरात आणि डिलिव्हरीबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच ‘Product Opportunity Explorer’ आणि AI लिस्टिंग टूल्समुळे विक्रेत्यांना नवीन संधी शोधणे सोपे होत आहे.

Amazon ने 2030 पर्यंत भारतात 35 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा देखील केली आहे. ही गुंतवणूक डिजिटलायझेशन, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मिती यावर केंद्रित असेल.

महाराष्ट्रात Amazon चे मजबूत लॉजिस्टिक्स नेटवर्क देखील उभारण्यात आले आहे. राज्यात 8 फुलफिलमेंट सेंटर्स, 6 सॉर्टेशन सेंटर्स आणि सुमारे 220 डिलिव्हरी स्टेशन कार्यरत आहेत. याशिवाय 3,500 पेक्षा जास्त ‘I Have Space’ स्टोअर्सचे जाळे आहे.

एकूणच, Amazon च्या या नव्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लघु आणि मध्यम विक्रेत्यांना मोठी चालना मिळणार असून डिजिटल अर्थव्यवस्थेत त्यांचा सहभाग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT