पुण्यातील सर्व शाळांना सुट्या जाहीर Pudhari File Photo
पुणे

Rain Update : पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यामध्ये मंगळवारी (दि.9) रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी (दि.9) सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये. याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी दिली आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT