महापालिकेच्या विभाजनासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; राज्य सरकारला प्रस्ताव पाठविणार pudhari
पुणे

Pune News: महापालिकेच्या विभाजनासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; राज्य सरकारला प्रस्ताव पाठविणार

महापालिका व जि.प.च्या माजी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिकेचे विभाजन करून स्वतंत्र महापालिका करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आता एकवटले आहेत. विभाजन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने सरकारला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेचे विभाजन करून पूर्व पुण्याची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी सर्वपक्षीय आमदारही आग्रही आहे. मात्र, सरकारचा तसा विचार नसल्याचे आमदार योगेश टिळेकर यांनी केलेल्या मलक्षवेधीफवर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशानात स्पष्ट केले. (Latest Pune News)

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्यामधील माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांची महापालिकेच्या विभाजनाबाबत रविवारी चर्चा करण्यासाठी वैचारिक मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महापालिकेचे विभाजन करून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत चर्चा झाली.

शहरावर फार मोठा ताण येत असल्याने महापालिकेचे विभाजन झाले पाहिजे, एकवर एकमत झाले. मात्र, नवीन महापालिका अस्तित्वात आली, तरी त्याला कसे उत्पन्न मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर आता उपनगरात मोठी बांधकामे असल्याने या नवीन पालिकेला उत्पन्नाचा चांगला पर्याय होईल अशी चर्चा झाली.

नव्या महापालिकेत कोणत्या भागाचा समावेश करावा अथवा वगळावा याचा योग्य निर्णय सरकारने घ्यावा. मात्र, हा निर्णय घेताना त्याचा आगामी महापालिका निवडणुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा सर्व उपस्थितांनी केली.

मात्र, सर्व पदाधिकार्‍यांचे महापालिकेचे विभाजन करून नवीन महापालिका करावी यावर एकमत झाले असून पुढील बैठकीत नगररचना तज्ज्ञांना बोलावून त्यांच्या सल्ल्याने सरकारला प्रस्ताव पाठविणार असल्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी सांगितले.

या बैठकीला प्रशांत जगताप, राजलक्ष्मी भोसले, संजय बालगुडे, श्रीकांत शिरोळे, जालिंदर कामठे, आश्विनी कदम, नीता परदेशी, शिवा मंत्री, विरेंद्र किराड, नरेंद्र व्यवहारे, आबा बागूल, सुभाष जगताप, उज्वल केसकर, नितीन कदम, प्रवीण तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT