घोरवडी धरण Pudhari
पुणे

Purandar dams: पुरंदर तालुक्यातील सर्व धरणे 'फुल्ल'; पिण्यासह शेतीच्या पाण्याची मिटली चिंता

घोरवडी धरणही झाले ’ओव्हरफ्लो’

पुढारी वृत्तसेवा

सासवड: किल्ले पुरंदर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे घोरवडी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाची एकूण साठवणक्षमता 67.50 दशलक्ष घनफूट असून, सध्या ते 100 टक्के क्षमतेने भरले असल्याची माहिती गराडे पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.

घोरवडी धरणातून दिवे प्रादेशिक योजना राबवली जाते. मात्र, सध्या पाइपलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही योजना बंद आहे. तरीदेखील सासवड शहर, सुपे-घोरवडी, शिवतारेवस्ती, चव्हाणवस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा, भिवडी या भागांतून पाणीपुरवठा नियमित सुरू आहे. या धरणातून सुमारे 55 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. (Latest Pune News)

मागील वर्षी जूनमध्ये धरणात मृतसाठा होता. मात्र यंदा मान्सूनपूर्व आणि नंतरच्या दमदार पावसामुळे पुरंदर तालुक्याच्या विविध भागांत चांगले पर्जन्यमान नोंद झाली. त्यामुळे धरण परिसरात मुबलक पाणीसाठा असून, पुढील 10 महिने पाणी टंचाईची शक्यता कमी आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी विश्वास पवार आणि एस. एच. कोरपडे यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने सासवड शहराला घोरवडी व गराडे धरण यांमधून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करण्यात आले असून, सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
-डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT