New Vehicles Pudhari
पुणे

Pune Akshaya Tritiya Vehicle Sales: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदीला पसंती

7,579 वाहनांची नोंद; दुचाकींचा सर्वाधिक वाटा, ई-वाहनांचीही वाढती मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली असून, यंदा या मुहूर्तावर प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे 7 हजार 579 वाहनांची खरेदी केल्याची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे 4 हजार 992 एवढ्या दुचाकी वाहनांचा समावेश आहे. तर, 1 हजार 973 चारचाकींचा समावेश आहे. याशिवाय 306 इलेक्ट्रिक पर्यावरण पूरक वाहनांचीही पुणेकरांनी खरेदी केल्याचे समोर आले आहे.

अक्षय तृतीया, गुढीपाडवा आणि दसरा या सणांच्या मुहूर्तावर वाहन, सोने, घरगुती वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदी करण्याची परंपरा आहे. शुभमुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवशी वाहन खरेदीसाठी ग््रााहक मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या खरेदीकडे वळतात. यंदाही शहरातील वाहनविक्रेत्यांनी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या होत्या. अनेक पुणेकरांनी यंदा 12 ते 19 एप्रिल 2026 या आठ दिवसांच्या कालावधीत 7 हजार 579 वाहनांची खरेदी केली. आरटीओने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून यंदा शहरात दुचाकी खरेदी सर्वाधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन खरेदीबाबतची आरटीओकडील आकडेवारी

  • दुचाकी: 4,992

  • कार: 1,973

  • रिक्षा: 71

  • टुरिस्ट टॅक्सी: 141

  • मालवाहू वाहने: 305

  • तीनचाकी मालवाहू: 21

  • अन्य वाहने: 43

  • ई-वाहने: 306

  • एकूण खरेदी: 7,579

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT