पुणे

द्वेषपूर्ण वातावरणात कबीरच आपला तारक; अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

पुणे : 'आज भवतालचे वातावरण बघताना कबीर आपल्याला आवश्यक आहेत. कबीर सर्व धर्माच्या पलीकडे आहेत, त्यामुळे या द्वेषाच्या वातावरणात कबीरच आपला तारक ठरू शकतो,' असे मत 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.

आर. के. सोनग्रा प्रकाशन, महाग्रंथ प्रकाशन उत्सव यांच्याद्वारे आचार्य रतनलाल सोनग्रा अनुवादित 'विश्वपारखी प्रबुद्ध महाकवी संत कबीरवाणी' या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन भारत सासणे यांच्या हस्ते झाले. पत्रकारभवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे व ज्येष्ठ लेखक दीपक चैतन्य, सोनग्रा प्रकाशनच्या प्रकाशक आरती सोनग्रा आदी उपस्थित होत्या.

सासणे म्हणाले, 'माणूस जाणतो आणि प्रेमाची भाषा बोलतो. हीच प्रेमाची भाषा आज आपल्याला तारक ठरणार आहसध्या बाहेरच्या वातावरणात द्वेषभावना पसरत असून, नकळत आपल्यातही ती येत आहे. त्याचे विषात रूपांतर होत आहे. या विषाचा उतारा म्हणजे संत कबीरांची ही प्रेमाची वाणी, सर्व धर्मांपलीकडचा माणुसकीचा विचार आहे. विविध स्वरूपात कबीर सतत आपल्या भोवती आहेच; फक्त कबीरांचे विचार अंमलात आणणे आवश्यक आहे.

SCROLL FOR NEXT