Pune District Cooperative Bank Pudhari
पुणे

Ajitdada Pawar Krishi Samruddhi Karj Yojana: PDCC ची 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना' सुरू; AI आधारित कर्ज योजनेचा 24 जुलैला शुभारंभ

पुण्यात भव्य शेतकरी मेळावा आणि आदर्श शेतकरी सन्मान सोहळा; AI तंत्रज्ञानावर आधारित कृषी कर्ज योजनेची माहिती मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (पीडीसीसी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना' सुरू करण्यात येत आहेत.

बँकेच्या या महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (दि. २४) दुपारी १२.३० वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंचमध्ये होणार आहे. याच वेळी भव्य शेतकरी मेळावा आणि आदर्श शेतकरी सन्मान सोहळा आयोजित केल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

या योजनेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे असून, कृषिमंत्री व बँकेचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय भरणे, खासदार पार्थ पवार तसेच माजी गृहमंत्री, आमदार दिलीप वळसे- पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, कात्रज दूध डेअरीचे अध्यक्ष अरुण चांभारे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते आणि सहकार आयुक्त दीपक तावरे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एआय- आधारित कृषी कर्ज योजनेची माहिती घ्यावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही दुर्गाडे यांनी केले आहे. या वेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT