पुणे

Baramati: : पुतणे युगेंद्र पवार यांनी अजित पवारांविरुद्ध थोपटले दंड

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीचे राजकारण आता पुन्हा काका-पुतण्याभोवती फिरावयास सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी काकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. 'बारामतीत दहशतीचे आणि वेगळ्याप्रकारचे राजकारण असेल, तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो', असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे.

युगेंद्र पवार यांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ गावभेट दौरे सुरू केले आहेत. उंडवडी येथे मंगळवारी (दि. 5) त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते. युगेंद्र म्हणाले, वेगळ्याप्रकारे कोणी दबाव आणायचा अथवा दहशतीचा प्रयत्न करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे, असे काही घडल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो. युगेंद्र हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे असून, त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्यात गावभेट दौरे सुरू केले आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT