leaders join Ajit Pawar's NCP
खोर: दौंड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहर व ग्रामीण भागातील अनेक प्रभावी नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष विलास शितोळे, वसीम शेख, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर, प्रकाश नवले, ज्येष्ठ नेते पोपटराव ताकवणे, नानासाहेब जेधे, सयाजी ताकवणे, विशाल बारवकर, सागर जाधव, माजी नगरसेवक जीवराज पवार, राजेश गायकवाड, अफजल पानसरे आणि प्रशांत धनवे यांनी पक्षात प्रवेश केला. (Latest Pune News)
या प्रवेशामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असून आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश "गेम चेंजर" ठरेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. हा प्रवेश सोहळा दौंड तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरेल असे राजकीय वर्तुळांमध्ये सध्या चर्चिले जात आहे. नितीन दोरगे यांनी तालुकाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्या नंतर सर्वात मोठा व पहिला पक्ष प्रवेश झाला आहे.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे , पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, युवक तालुका अध्यक्ष सागर फडके, शहर युवक अध्यक्ष निखिल स्वामी तसेच अनिल नागवडे, गुरुमुख नारंग, महेश भागवत उपस्थित होते.