Pune DPC Meeting  dispute
निधीवरून खा. सुप्रिया सुळे आणि आ.सुनिल शेळके यांच्यामध्ये बाचाबाची झली. Pudhari News Network
पुणे

Supriya Sule on Sunil Shelke | अजित पवार, शरद पवारांसमोर सुप्रिया सुळे - सुनिल शेळकेंमध्ये बाचाबाची

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची एकही संधी न सोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शनिवारी (दि. २०) पुण्यात एकत्र आले. यावेळी खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली. याला निमित्त ठरले पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक. या बैठकीमध्ये ही एकमेकांना घेरण्याचा देखील प्रयत्न झाला.

पवार कुटुंबातील सदस्य एकत्र आल्याने चर्चा

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठक शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. विधानसभा काही दिवसांवर आल्याने ही बैठक सर्वच पक्षासाठी महत्वाची मानली जात होती. या बैठकीमध्ये सर्वाधीक चर्चा रंगली ती पवार कुटुंबातील सदस्य एकत्र आल्याची.

डीपीसीच्या बैठकीत तिघेजण एकत्र

दरम्यान, आमदार अतुल बेनके यांनी अगोदरच शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर डीपीसीच्या बैठकीत सर्वजण एकत्र आले. या बैठकीत शरद पवार यांनी निधीचा प्रश्न, पाण्याचे प्रदूषण यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्याचे अजित पवार यांनी उत्तर दिलेच, मात्र त्यामध्ये सुप्रिया सुळे, आमदार सुनील शेळके यांनी सहभाग घेतल्यानंतर एकमेकांवर आरोप करण्यात आले.

निधीवरून सुप्रिया सुळे- सुनिल शेळके यांच्यामध्ये बाचाबाची

प्रत्येक तालुक्याला किती निधी देण्यात आला, याची माहिती शरद पवार यांनी विचारल्यानंतर त्याची सविस्तर माहिती घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. मावळला जास्त निधी दिल्याचे सुळे म्हणाल्या. नंतर शेळके यांनी आक्रमक पवित्रा घेत "आम्ही बारामती किती निधी दिला, याबद्दल आजपर्यंत कधी काही बोललो नाही. पालकमंत्र्यांनी मावळच्या जनतेच्या विकासासाठी निधी दिला आहे." त्यानंतर सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

SCROLL FOR NEXT