Ajit Pawar  pudhari news
पुणे

Ajit Pawar Plane Crash: 40 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं, अजित पवार कोणत्या विमानातून प्रवास करत होते, अपघात कसा झाला?

Baramati Plane Crash: लँडिंग होणार इतक्यात... बारामती विमानतळ मॅनेजरनं सांगितलं नेमकं काय घडलं.

Anirudha Sankpal

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्रातील सर्वात दुःखद बातमी आज (दि. २८ जानेवारी) सकाळी येऊन धडकली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आज सकाळी ते बारामतीला प्रचार सभा घेण्यासाठी जात होते. यावेळी त्यांच्या विमानाचा लँडिंगवेळी अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाला होता.

अजित पवार बुधवारी बारामतीला का जात होते?

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येत होते. आज त्यांच्या बारामती तालुक्यात चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. अजित पवार सकाळी लवकर चार्टड विमानाने बारामतीला निघाले होते.

बारामती विमानतळावर उतरत असतानाच विमानाला अपघात झाला. या विमानात अजित पवारांसह पाच प्रवासी प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

विमान कोणत्या कंपनीचं होतं?

अजित पवार मुंबईवरून बारामतीला येत असलेले Lear jet 45, VT-SSK हे विमान VSR या खासगी कंपनीचं होतं. हे एक चार्टड विमान होतं. यातीली प्रवासी संख्या कमी असते. सहसा राजकीय नेते हे आपल्या दौऱ्यांसाठी अशाच प्रकारचे खासगी चार्टड विमाने वापरतात.

विमानातून कोण कोण प्रवास करत होतं?

या विमानात एकूण ५ प्रवासी प्रवास करत होते.

1. अजित पवार

2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव

3. पायलट कॅप्टन सुमित कपूर

4. कॅप्टन संभवी पाठक

5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

प्रवासाचा वेळ किती?

अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानानं मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ केलं. त्यानंतर ते बारामती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग करणार होतं. मात्र लँडिंग करण्याच्या काही क्षण आधी या विमानाला अपघात झाला.

लँडिंग होणार इतक्यात...

अजित पवारांच्या विमानाला अपघात कसा झाला याबाबत सध्या तरी अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी बारामती एअरपोर्ट मॅनेज शिवाजी तावरे यांनी हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार VT SSK हे विमान रनवे क्रमांक ११ जवळ लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ते रनवेवरून बाजूला गेले अन् क्रॅश झाले.

विमान क्रॅश झाल्यानंतर विमानात स्फोट झाला अन् त्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण विमान पेटलं.

बारामती विमानतळ हे काही काळापूर्वी एक खासगी कंपनी ऑपरेट करत होती. मात्र नुकतेच हे विमानतळ महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT