पुणे

बारामतीमध्ये ‘आमचा दादा’चे बॅनर झळकले; शरद पवार, सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे गायब

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्याचे राजकारण अजित पवार यांच्या बंडानंतर ढवळून निघाले आहे. मात्र, बारामतीत अजित पवार यांना कार्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या वाणेवाडी गावात अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर युवकांनी मआमचा विठ्ठल, आमचा दादाफ या आशयाचे बॅनर लावल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच गावातील मुख्य चौकात फटाके फोडून तसेच गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

आजपर्यंत बारामती पश्चिम भागात राष्ट्रवादीच्या प्रत्येक बॅनरवर ज्येष्ठ नेते शरद पवार व खा. सुप्रिया सुळे तसेच अजित पवार यांची छायाचित्रे हमखास असायची, मात्र युवकांनी लावलेल्या बॅनरवरून शरद पवार व सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे गायब झालेली दिसतात. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी बाहेर पडून मंत्रिपदाचही शपथही घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी मअ‍ॅक्टिवफ होत त्यांना शह देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, या बॅनरबाजीमुळे अजित पवारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात उलथापालथ झाली. अजित पवार यांना मतांचे भरभरून दान देणार्‍या बारामतीकरांमध्ये या बंडावर दोन मतप्रवाह झाल्याचे दिसून येत आहे. प्रमुख पदाधिकारी अजित पवारांना भेटायला मुंबई येथे गेले, तर काही पदाधिकार्‍यांनी मवेट अ‍ॅन्ड वॉचफ ही भूमिका घेत शांत राहणे पसंत केले. बारामतीच्या पश्चिम भागात शरद पवार यांनी सुरुवातीला सोमेश्वर कारखाना ताब्यात घेत या कारखान्याला वैभव प्राप्त करून दिले. यानंतर अजित पवार यांनीही राजकारणाच्या माध्यमातून कारखान्यावर आपली पकड घट्ट केली.

सहकार, क्रीडा, शिक्षण, समाजकारण क्षेत्रात कार्यरत राहत दोन्ही पवारांनी बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. युवक पदाधिकार्‍यांचा मात्र अजित पवार यांना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या तरी बारामतीत पाहायला मिळत आहे. करंजेपूल येथेही सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी चौकात अजित पवार यांना पाठिंबा देत गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT