गुलाबी रंगाचे जॅकेट घातले तर तुम्हाला काही त्रास File Photo
पुणे

Politics| गुलाबी रंगाचे जॅकेट घातले तर तुम्हाला काही त्रास; अजित पवार यांचा सवाल?

'पिंक पॉलिटिक्स'वर अजित पवार यांचा पत्रकारांना सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : समाजात वावरताना कोणत्या रंगाचे कपडे घालायचे, हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला असून, मलाही व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मी माझ्या पैशाने कपडे खरेदी करतो. जे सर्वसाधारण लोक घालतात, त्याच प्रकारचे कपडे मी घालतो.

माझ्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार जे पटते ते कपडे मी घालतो, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. मी गुलाबी रंगाचे जॅकेट घातले तर तुम्हाला काही त्रास होतो का? असा सवाल त्यांनी केला.

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. तसेच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, तेव्हाही त्यांच्या गळ्यात गुबाली रंगाचे उपरणे दिसून आले होते. याशिवाय बारामतीत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान देखील व्यासपीठापासून तर सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला होता. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे वातावरण गुलाबी करण्याचा त्यांचा मानस असू शकतो.

पण, तसे होईल, असे वाटत नाही, जॅकेट घालून राजकारण होत नाही, असा टोला लगावला होता. पवार पुढे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुका महायुती भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर इच्छुकांकडून कोणता भाग कोणत्या पक्षाला जाईल, याची चाचपणी सुरू होते. त्यानंतर उमेदवारीसाठी काही नेते इकडेतिकडे जातात.

ही सुरुवात असून, अजून बराच काळ जायचा आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत पत्रकारांनी उल्लेख करताना फालतू बडबड करायला मी मोकळा नाही. मी कामाचा माणूस आहे. दररोज सात वाजता माझे काम सुरू होते. विकासाबद्दल व गरिबीबद्दल विचारा, असे सांगितले. दरम्यान, गरिबी कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध योजना आणल्या असून, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने हे पाऊस उचलण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्याने सोडून देतो

विधानसभेमध्ये तुम्ही तिसरी आघाडी करणार का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, अशा बातम्या मी देखील ऐकल्या आहेत. माझीदेखील करमणूक होते. बातम्या एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT