SPPU Pudhari
पुणे

AISHE Survey Colleges: एआयसीएचई सर्वेक्षणाची माहिती तातडीने भरा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संलग्न, स्वायत्त महाविद्यालयांना दोन दिवसांची अंतिम मुदत

पुढारी वृत्तसेवा

पुणे : अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षणाची माहिती भरण्यासाठी उच्च शिक्षण विभाग नवी दिल्ली यांच्याकडून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्याप काही महाविद्यालयांनी माहिती पूर्णपणे भरलेली नाही. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांना एआयसीएचई सर्वेक्षणातील माहिती दोन दिवसांत भरण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत उच्च शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षण (एआयसीएचई) अंतर्गत महाविद्यालयांना ताबडतोब माहिती भरावी लागणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची माहिती अद्याप भरण्यात आलेली नाही.

विद्यापीठांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याद्वारे संबंधित महाविद्यालयांनी एआयसीएचई पोर्टलवर आवश्यक माहिती भरणे व अद्ययावत करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये तसेच मान्यताप्राप्त संस्थांकडून १५ जुलै २०२५ पासून माहिती मागविण्यात येत आहे.

परंतु, काही महाविद्यालयांनी अद्याप माहिती भरली नाही, त्यामुळे हे तातडीचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. माहिती भरण्यात येणारे पोर्टल बंद करण्यात येणार असल्याची माहिती ई-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधित महाविद्यालयांनी वेळेत माहिती भरून सहकार्य करावे, असे आवाहन विद्यापीठाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्या संचालकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT