पुणे: दिल्लीहून पुण्याकडे येणार्या एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक बसल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7.14 वाजता समोर आली आहे. विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले.
विमान दिल्लीहून पहाटे 5.31 वाजता निघाले होते. लँडिंगनंतर नियमित तपासणीदरम्यान विमानाच्या बाह्यभागाला पक्षी धडकल्याचे निदर्शनास आले. हे विमान पुण्यावरून पुन्हा दिल्लीला जाणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकार्यांनी दिली. (Latest Pune News)
विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतरच ते पुन्हा सेवेत वापरण्यात येईल, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अचानक झालेल्या या निर्णयामुळे काही प्रवाशांची गैरसोय झाली.