‘एआय’ ठरणार 21 व्या युगाचा ‘स्टेथोस्कोप’ Pudhari
पुणे

AI in Healthcare: ‘एआय’ ठरणार 21 व्या युगाचा ‘स्टेथोस्कोप’ — डॉ. सौम्या स्वामीनाथन

प्रतिजैविकांचा अतिरेक 2050 पर्यंत मृत्यूचे प्रमुख कारण ठरेल; आरोग्य सेवेत एआयचा टूलसारखा वापर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ‌‘एआय‌’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता 21 व्या जगाचा स्टेथोस्कोप ठरणार आहे. कारण तोच रोगांचे निदान प्रचंड वेगाने करण्यास सक्षम आहे. त्यामुळे एआय म्हणजे 21 व्या युगातील स्टेथोस्कोप ठरणार आहे. आपण हल्ली प्रतिजैविकांचा मारा शरीरावर इतक्या मोठ्या प्रमाणात करीत आहोत ज्यामुळे 2050 पर्यंत सर्वाधिक मृत्यूचे कारण ही प्रतिजैविक औषधी ठरतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी संचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी पुणे शहरातील व्याख्यानात दिला.(Latest Pune News)

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने पाषाण येथील सभागृहात शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‌‘पीआयसी‌’चे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. स्वामीनाथन यांनी आगामी काळातील मानवी जीवन आणि आरोग्य, वैद्यकीय तंत्रज्ञानातील वेगवान बदल, संशोधन एआयमुळे होणारा आमूलाग््रा बदल याचा 2050 पर्यंतचा आरोग्य आलेखच सादर केला. जगात आणि भारतातील आरोग्य सेवा यांचा तौलनिक अभ्यासही त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मांडला.

प्रतिजैविकांचा मारा घातक

त्या जगासह भारताच्या आरोग्याचा नकाशाच सादर करीत सांगितले की, आपण प्रतिजैविके इतक्या मोठ्या प्रमाणावर सेवन करीत आहोत की 2050 पर्यंत सर्वाधिक मृत्यूचे कारण प्रतिजैविके ठरणार आहेत. कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आजाराने देखील भविष्यात इतके मृत्यू होणार नाहीत.

‌‘एआय‌’चा वापर करावा टूलसारखा

वैद्यकीय आजारांचे निदान डॉक्टरांपेक्षा आता एआय प्रचंड वेगाने करीत आहे. माणसाला कोणते आजार पुढच्या दहा ते वीस वर्षांत होऊ शकतात हे ‌‘एआय‌’ सांगू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा टूल म्हणून वापर करायलाच हवा. अल्झामरसारख्या आजारांचे निदान करण्याची ताकद सध्या फक्त एआय मध्ये आहे. कारण डॉक्टर लाखो पुस्तकांचे ज्ञान एकत्र साठवू शकत नाहीत, जे एआय करू शकते. डॉक्टरांच्या ज्ञानाला मर्यादा पडतात, तेथे ‌‘एआय‌’चा उपयोग होऊ शकेल.

काय म्हणाल्या डॉ. स्वामीनाथन?

क्लायमेंट चेंजचे भारतासहजगासमोर आव्हान ठरणार.

मी आज दिल्लीतून पुण्यात आले, तेव्हा तेथील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) 350 इतकी खराब होती, खूप खराब श्रेणीत आहे.

हवा प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या खूप आव्हानात्मक.

तापमानातील बदल हे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे संकट.

तयार अन्न, अतिमांसाहार हे आरोग्यासमोरील मोठे धोके.

भारताने प्राथमिक आरोग्य केंद्रे वाढवावीत, तर आजारांचे योग्य निदान आणि वैद्यकीय सुविधा मिळतील.

आपल्या देशात राज्यवार आरोग्याच्या समस्या बदलांचा डेटा गोळा करणे गरजेचे.

आपल्या देशात अजूनही 40 टक्के महिला सरपण जाळून स्वयंपाक करतात.

उज्ज्वला योजनेने पहिला गॅस मिळला, मात्र दुसरा गॅस घेण्यास 40 टक्के महिलांना आजही परवडत नाही.

महिलांना श्वसन विकारांचा धोका

भारतातून क्षयरोग नामशेष झालेला नाही. अनेकांना या आजाराने ग््राासले आहे. त्यावर मोठे काम करण्याची गरज.

भारताने आरोग्याचे बजेट दीडवरून 3 ते 4 टक्क्यांवर नेण्याची गरज.

कोविड आटोक्यात आणण्यात भारताने खूप चांगले काम केले. आपल्याच देशाने ऑनलाइन प्रमाणपत्रे वेगाने दिली.

देशात कोविड काळासारखेे एकजुटीने काम झाले, तर देश आरोग्यसंपन्न होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT