छायाचित्रणाच्या दुनियेत ‘एआय’ची ‘एन्ट्री’; विविध अ‍ॅपवर एडिटिंगसाठी टूल्स Pudhari
पुणे

AI in photography: छायाचित्रणाच्या दुनियेत ‘एआय’ची ‘एन्ट्री’; विविध अ‍ॅपवर एडिटिंगसाठी टूल्स

तरुण छायाचित्रकारांकडून वापर

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: एखाद्या छायाचित्रातील पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) बदलायची असेल किंवा छायाचित्रात रंगसंगती बदलयाची असेल... आता छायाचित्रांच्या एडिटिंगसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला असून, छायाचित्रणाच्या दुनियेत एआयने प्रवेश केला आहे. विविध अ‍ॅपवर एडिटिंगसाठी एआय टूल्स उपलब्ध असून, त्याचा वापर तरुण छायाचित्रकारांकडून वाढला आहे.

खासकरून लग्न, पर्यटन, वन्यजीव, क्रीडा आणि खाद्यसंस्कृती अशा विविध प्रकारातील छायाचित्रांच्या एडिटिंगसाठी एआय अ‍ॅप वापरले जात आहे. अगदी कमी वेळेत त्यांना हवे तसे छायाचित्र एडिट करून मिळत आहेत. त्यामुळे विशेषत: तरुण छायाचित्रकारांकडून एआयचा वापर केला जात आहे.  (Latest Pune News)

छायाचित्रणाच्या दुनियेत काळानुरूप अनेक तंत्रज्ञानात्मक बदल झालेले असून, आता तर छायाचित्रांच्या एडिटिंगसाठी विविध अ‍ॅपवर एआय टुल्स वापरता येत असून, गुगल प्ले स्टोअरवर एआय फोटो एडिटिंग अ‍ॅप सर्च केल्यानंतर असे वेगवेगळे अ‍ॅप पाहायला मिळतील, ज्यात छायाचित्रकारांना छायाचित्र एडिट करता येत आहेत. खासकरून व्यावसायिक छायाचित्रकारांकडून एआयचा वापर केला जात आहे. आज मंगळवारी (दि.19) साजर्‍या होणार्‍या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने या नव्या ट्रेंडविषयी जाणून घेतले.

पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे म्हणाले, छायाचित्रणाच्या क्षेत्रात एआयचा वापर सध्या छायाचित्र एडिटिंगसाठी केला जात आहे. याची माहिती छायाचित्रकारांना व्हावी, यासाठी आम्ही संस्थेकडून एआयच्या वापराबाबतची कार्यशाळा घेतली होती.

... असा आहे छायाचित्रणाचा ट्रेंड

खाद्यसंस्कृती, पर्यटन, ऐतिहासिक स्थळांना भेटी, सण- उत्सव यासह बेबी शूट, मॅटर्निटी शूटकडे सर्वाधिक कल आहे. 18 ते 40 वयोगटातील तरुणाई छायाचित्रणाकडे वळली असून, इन्स्टाग्राम, फेसबुकवर त्यांनी काढलेली छायाचित्रे झळकत आहेत, त्यांच्या छायाचित्रणाला दाद मिळत आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे एआय एडिटिंग अ‍ॅप सध्या उपलब्ध आहेत. त्याद्वारे आम्ही छायाचित्र एडिट करतो. उदा. छायाचित्रातील पार्श्वभूमी बदलण्यापासून ते रंगसंगती बदलण्यापर्यंतच्या गोष्टी करता येतात.
- विवेक गाटे, छायाचित्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT