पुणे

इंदापूर तालुक्यात शेतकर्‍यांची कृषिसेवा केंद्रांकडे पाठ

अमृता चौगुले

बावडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते, औषधे यांचा पुरेसा साठा करून कृषिसेवा केंद्रे सज्ज आहेत. मात्र, सध्या शेतकर्‍यांनी पाऊस लांबल्याने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. जुलै महिन्यात समाधानकारक पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच कृषिसेवा केंद्रचालकांना दिलासा मिळाला आहे. इंदापूर तालुक्यात खरीप हंगामात बाजरी, तूर, उडीद, सोयाबीन, सु्यफूल तसेच मका आदी पिके घेतली जातात.

दूध उत्पादक शेतकरी चारापिकांची लागवड करतात, अशी माहिती प्रगतशील शेतकरी रणजित घोगरे (निरनिमगाव), योगेश देवकर (रेडा), अनिल काळे (रेडणी) यांनी दिली. कृषिसेवा केंद्रचालकांनी बियाणे कंपन्यांकडे खरीप हंगामातील बियाण्यांचे बुकिंग केले होते. बियाण्यांचा साठा आता कृषिसेवा केंद्र चालकांनी दुकानांमध्ये उपलब्ध करून ठेवला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते पुरेशा प्रमाणात, वेळेवर व योग्य दरामध्ये उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभाग सज्ज असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT