पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कोरियातील जेजू नॅशनल विद्यापीठ यांच्यात करार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि दक्षिण कोरियाचे जेजू नॅशनल विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक आणि संशोधनास चालना देण्याच्या दृष्टीने रविवारी सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य संचालक डॉ. संजय ढोले तसेच जेजू नॅशनल विद्यापीठाचे प्रेसिडेंट किम इल व्हान यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

या करारांतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे, संशोधनामध्ये सक्रिय सहभाग, संयुक्त परिषदा आणि कार्यशाळांचे आयोजन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, स्किल बेस अभ्यासक्रम, सांस्कृतिक देवाणघेवाण, नवकल्पना व नवप्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या करारान्वये दोन्ही विद्यापीठांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांसाठी असंख्य संधी निर्माण करेल आणि ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल. डॉ. काळकर यांनी आभार मानले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT