पुणे: शहरात विविध विकासकामे सुरू असून, यासाठी विविध विभागांकडून रस्त्याची खोदाई केली जात आहे. या रस्ते खोदाई केल्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. एकीकडे रस्त्यावर अनेक खड्डे असताना पालिकेच्या पथ विभागाने मात्र शहरात 1 एप्रिलपासून तब्बल 1790 खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पाण्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास पुणेकरांना करावा लागला आहे. शहरातील रस्ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरात काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहे. (Latest Pune News)
ही कामे सुरूच आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. त्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या बाबत पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांना माहिती विचारली असता त्यांनी 1 एप्रिल पासून शहरातील 1790 खड्डे बुजवल्याचा दावा केला. तसेच 185 चेंबरची दुरुस्ती करण्यात आली असून पाणी साठणार्या 12 ठिकाणी उपाय योजना केल्याचे पावसकरयांनी संगीतले.
पावसकर म्हणाले, शहरात विविध विभागांकडून सुरु असलेली कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहे. खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. बीएमसीसी रस्त्यावर काम सुरू आहे. म्हात्रे पूल डीपी रोड ते प्रतिज्ञा सोसायटी या दरम्यान ड्रेनेजचे काम सुरू आहे. गांजवे चौकातील पत्रकार भवन ड्रेनेजचे काम सुरू आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.