पुणे

स्टोन क्रशरवर होणार कारवाई; तहसीलदारांनी दिली नोटीस

Laxman Dhenge

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील स्टोन क्रशरवर कारवाईचा बडगा तहसीलदार अरुण शेलार यांनी उचलला असून, 24 तासांत स्टोन क्रशर परवानगीची सर्व कागदपत्रे घेऊन हजर व्हा, अशा नोटिसाच त्यांनी स्टोन क्रशरच्या मालकांना पाठविल्या आहेत. वासुंदे, पांढरेवाडी, हिंगणी गाडा परिसरातील स्टोन क्रशरवर यामुळे कारवाई होणार, अशी माहिती शेलार यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली. या वेळी शेलार म्हणाले की, पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम या भागातील स्टोन क्रशरच्या धुळीच्या लोटांमुळे होत आहे. परिसरातील घरांना तडे गेल्याचे वर्तमानपत्रांतील बातम्यांमुळे समजलेले आहे.

या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंडलाधिकार्‍यांना आदेश करण्यात आलेले आहेत. स्थळपाहणी करून योग्य ती चौकशी करण्यात यावी आणि खाणधारकांनी गौणखनिज विकास व विनिमय नियम 2013 अन्वये अटी व शर्तींचे पालन केले आहे की नाही? याची सखोल चौकशी करून त्याचा अंतिम अहवाल मागविलेला आहे, यामध्ये काही तथ्य आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. दौंड तालुक्यामध्ये खानोटा परिसरात 100 एकरांपेक्षा जास्त जमिनीवर खाण आहे. पैकी चार स्टोन क्रशर हे आर्थिकदृष्ट्या प्रबळ, राजकीय आशीर्वादाचे असल्यामुळे ते कुणालाही जुमानत नसल्याने त्यांचीच 'री' इतर ओढत आहेत. बाकी सर्व व्यावसायिकांनी शासनाला गंडा घालत त्यांची दिशाभूल करीत येथे खाण उत्खनन जोरात सुरू केलेले आहे, अशा स्वरूपाची तक्रार येथील ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकर्‍यांची होती.

या अनुषंगाने दै. 'पुढारी'ने यामध्ये लक्ष घालून मोठ्या प्रमाणात या विषयाच्या बातम्या प्रकाशित केल्या आहेत. या बातम्यांची दखल घेऊन दौंड तहसीलदारांनी हा विषय गांभीर्याने हाताळण्यात आलेला आहे, त्यांनी या सर्वांचा मंडलाधिकार्‍यांना अहवाल घेऊन यावा, असे आदेश केलेले असून, या आदेशातून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. तहसीलदारांच्या बडग्याने स्टोन क्रशरच्या मालकांचे धाबे दणाणले असले, तरी सर्वाधिक भीतीचे वातावरण या गावातील या स्टोन क्रशर दलालांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे, यातील काहींनी या क्रशरमालकांची पाठराखण करण्यासाठी गावकर्‍यांमध्ये आपापसांत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT