अच्युत गोडेबोले (Pudhari Photo)
पुणे

Achyut Godbole: अच्युत गोडेबोले यांना यंदा डॉ. भांडारकर पुरस्कार जाहीर

155 years Prarthana Samaj | प्रार्थना समाज संस्थेच्या स्थापनेला यंदा 155 वर्षे पूर्ण होत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : प्रार्थना समाज संस्थेच्या स्थापनेला यंदा 155 वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यानिमित्त संस्थेतर्फे आयोजित वार्षिक महोत्सवात अच्युत गोडबोले यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्‍याचबरोबर डॉक्टर ऑफ बेगर्स म्हणून ओळखले जाणारे डॉ. अभिजित सोनवणे व डॉ. मनीषा सोनवणे यांच्या सोहम ट्रस्ट संस्थेला महर्षी रामजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे वितरण सोहळा येत्‍या गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात सायं. ५ वाजता पार पडणार आहे. या पुरस्काराचे वितरण डेक्कन महाविद्यालयाचे माजी संचालक पद्मश्री डॉ. के. पद्दय्या यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे धनराज निंबाळकर उपस्थित होते. या प्रसंगी 'झेप रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन' या संस्थेच्या संस्थापिका नेत्रा पाटकर यांची डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे यंदा अकरावे वर्ष आहे. रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे तीनही पुरस्कारांचे स्वरूप आहे, असेही डॉ. जोग यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT