पुणे

पिंपरी : मित्राचा खून करणार्‍या आरोपीला अटक

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मित्राचा खून करून पळालेल्या आरोपीला रावेत पोलिसांनी कल्याण येथून अटक केली. ही घटना 4 सप्टेंबर रोजी रावेत येथील एका बांधकाम साइटवर घडली होती. विवेक गणेश पासवान (24, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. दिनेश रामविलास यादव (21, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवकुमार घनश्याम प्रजापती (19, रा. मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुंबई-पुणे महामार्गालगत किवळे येथे एक बांधकाम साईट सुरू आहे. मयत विवेक पासवान हा इतर पाच जणांसह बांधकाम साईटवरील पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होता. दरम्यान, मजुरांचा पगार झाल्याने त्यांनी पार्टी केली. पार्टीनंतर विवेक याच्या खोलीतील इतर चौघे मजूर झोपले होते. त्या वेळी विवेक आणि दिनेश यादव हे दोघेही पुन्हा मद्यपान करण्यासाठी गेले. मद्यपान करून आल्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले. या भांडणात दिनेश यादव याने विवेक पासवान याच्या तोंडावर सिमेंटची विट मारली. ज्यामुळे गंभीर जखमी होऊन विवेक याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी दिनेश यादव फरार झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना रावेत पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका फुटेजमध्ये आरोपी मुंबईच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी तांत्रिक तपास करून कल्याण येथील शिवाजी चौकातून आरोपीला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पी आर शिकलगार, विशाल जाधव, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलिस अंमलदार कोळगे, गायकवाड, नंदलाल राऊत, रमेश तांबे, संतोष तांबे, विजयकुमार वाकडे, रमेश ब—ाह्मण, संतोष धवडे, महिला पोलिस अंमलदार धाकडे यांनी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT